आमच्याबद्दल
आमच्या गावाची ओळख, इतिहास आणि भविष्यकालीन वाटचाल.
इतिहास आणि ओळख
्आपली ग्रामपंचायत – प्रगतीची दिशा, विकासाची ओळख! सुंदर निसर्ग, एकदिलाने काम करणारे नागरिक आणि पारदर्शक प्रशासन हे आमच्या ग्रामपंचायतीचे वैशिष्ट्य आहे. स्वच्छता, शिक्षण, डिजिटल सेवा आणि सर्वांगीण विकास यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. गावाचा प्रत्येक नागरिक हा आमच्या प्रगतीचा भागीदार आहे.
येथील लोकांचा मुख्य व्यवसाय द्राक्ष शेती असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून येथील शेतकरी उत्तम दर्जाचे उत्पादन घेत आहेत. गावातील एकजूट आणि सामाजिक सलोखा हे आमच्या गावाचे वैशिष्ट्य आहे.
ग्रामपंचायतीचे ध्येय
"एक आत्मनिर्भर, सुशिक्षित, निरोगी आणि प्रगतशील गाव तयार करणे, जिथे प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळेल आणि गावाचा शाश्वत विकास होईल."
या ध्येयासाठी आम्ही पारदर्शक कारभार, डिजिटल सेवांचा विस्तार, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित करत आहोत.
गावाची सांख्यिकी ( 2011 नुसार)
एकूण लोकसंख्या 684
684
(पुरुष:, महिला )
एकूण घरे
278
पक्की आणि कच्ची घरे
साक्षरता दर
८८%
उच्च शिक्षणाकडे वाढता कल
मुख्य व्यवसाय
शेती
(द्राक्ष, ऊस, भाजीपाला)
गावातील प्रमुख सुविधा
शिक्षण
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (इयत्ता ७ वी पर्यंत) आणि खासगी माध्यमिक विद्यालय.
आरोग्य
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि प्रशिक्षित आशा सेविका.
पाणीपुरवठा
'जल जीवन मिशन' अंतर्गत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा.
दळणवळण
पुणे शहराशी जोडणारे पक्के रस्ते आणि एस.टी. बस सेवा.
मंदिरे
काळभैरवनाथ मंदिर ,विठ्ठल रुखमिनी मंदिर ,तामजाई माता मंदिर , शिव गोरक्ष मठ